रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "रोटरी महिला सन्मान सोहळा २०२५ " वसंत व्हिला सभागृहात आयोजित करण्यात आला ...
रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "रोटरी महिला सन्मान सोहळा २०२५ " वसंत व्हिला सभागृहात आयोजित करण्यात आला होता.अशी माहिती क्लबचे अध्यक्ष हेमंत महाजन यांनी दिली.या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील महिलांचा सन्मान रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने करण्यात आला.यावेळी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी प्रांतपाल रो.मंजू फडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.त्यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मोनिका अनिलतात्या मेहेर,राजकीय क्षेत्रातील ग्रामपंचायत नारायणगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉ.शुभदा पंकज वाव्हळ,शैक्षणिक क्षेत्रात चाळीस पेक्षा अधिक वर्षे मौलिक योगदान देणाऱ्या राजश्री मंगलकुमार चिंतामणी,वैद्यकीय क्षेत्रातील फिजिओथेरपीस्ट डॉ.दिक्षा दिपक वारूळे(दोनाडकर),उद्योग व्यवसाय क्षेत्रात सोनाली एंटरप्रायजेसच्या माध्यमातून बटाटा व केळी वेफर्सचा व्यवसाय करणाऱ्या सोनल नितीन पारधी व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या तेजश्री सुशिलकुमार साळुंखे या सर्वांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महिला संचलित विविध संस्थांचाही गौरव करण्यात आला.यामध्ये जिजामाता पतसंस्थेचा गौरव संस्थापिका राजश्रीताई बोरकर यांनी सहकारी महिला सदस्यांसमवेत स्विकारला.इंद्रधनु ग्रुपचा गौरव अध्यक्षा सुरेखा वाजगे व महिला सदस्यांनी स्विकारला.अंजली खैरे यांनी स्थापन केलेल्या श्री आदिशक्ती महिला प्रतिष्ठानचा गौरव संस्थेच्या महिला सदस्यांनी स्विकारला. इनरव्हील क्लबचा गौरव अध्यक्षा सविता खैरे आणि महिला सदस्यांनी स्विकारला.चैतन्य हास्ययोग मंडळ अर्थात हास्यक्लबचा गौरव अध्यक्षा डॉ. स्मिता डोळे व महिला सदस्यांनी स्विकारला.प्रतिथयश जयहिंद शैक्षणिक संकुलाचा गौरव संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.शुभांगी गुंजाळ यांनी स्विकारला.श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कुलचा गौरव मुख्याध्यापिका अनघा जोशी व सहयोगी शिक्षिका तसेच श्री उमाजी दगडूजी तांबे अॕसेंट स्कूलचा गौरव मुख्याध्यापिका सुचेता भुजबळ व सहयोगी शिक्षिका व श्रीमती एस.आर. केदारी बालकमंदिरचा गौरव मुख्याध्यापिका सुनिता पारखे व सहयोगी शिक्षिकांनी स्विकारला. शिवनेरी ब्लड सेंटर मंचरचा गौरव संचालिका वर्षा शेटे यांनी स्विकारला.पोलीस स्टेशन नारायणगाव येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला.
यावेळी राजश्रीताई बोरकर,मुख्याध्यापिका अनघा जोशी व सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लब नारायणगावच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी रो.मंजू फडके यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांनी इतर जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवला पाहिजे व त्यात आवडीच्या गोष्टी करून स्वतःचा आनंद वाढविला पाहिजे.तसेच रोटरी ही जागतिक संघटना महिलांना अधिकाधिक वाव देते ज्यामधून महिलांना स्वकर्तृत्व सिध्द करण्याची संधी मिळते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष हेमंत महाजन यांनी केले.सूत्रसंचालन क्लबच्या सदस्या डॉ.सीमा जाधव व डॉ. केतकी काचळे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रिया घोडेकर यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सभासद व महिला भगिनींनी केले.
COMMENTS