विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त सुराळे येथील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायत सुराळे येथील उप...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त सुराळे येथील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायत सुराळे येथील उपसरपंच तथा जुन्नर तालुका वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲड. सचिन यशवंत चव्हाण यांच्या सौजन्याने करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सुराळे येथील ग्रामसेविका श्रीमती अश्विनी आझादे यांनी दिली.
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सायबर सुरक्षा जागृती या विषयी कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रम प्रसंगी जुन्नर येथील विद्यार्थी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे श्री. लोंढे सर यांनी सुराळे येथील महिला दिन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथील सौ राजश्री ताला यांनी महिलांना बचत गटाच्या मार्फत व्यावसायिक मार्गदर्शन केले. या या कार्यक्रमास सरपंच सौ. नीता घोगरे, ग्रामपंचायत सदस्य सौ .कविता मातेले, स्वाती चतुर, शेवंता केदारी, पुष्पा घोगरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ.गीता शेटे ,सौ. शीला मातेले अंगणवाडी सेविका, सौ. सुलाबाई शिंदे , सीताबाई गजानन दुधवडे अंगणवाडी मदतनीस, सौ. प्रियंका शेटे ग्रामसंघ लिपीका, सौ सोनल मातेले सी.आर.पी, श्रीमती छाया मातेले आशा वर्कर, सौ रंजना मधे मोबिलायझर, श्रीमती मंगल मरभळ जिल्हा परिषद शिक्षिका, श्रीमती अश्विनी आझादे ग्रामसेविका इत्यादी महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे येथील मा. इंगळूणकर सर यांचे महिला आरोग्यावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमास सुराळे येथील महिला बचत गटातील अध्यक्ष , सचिव व सर्व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS