कराड- मातंग समाज आणि मातंग समाजातील तत्सम जातींच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून कर्ज ...
कराड- मातंग समाज आणि मातंग समाजातील तत्सम जातींच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून कर्ज वितरणात जाचक अटी असल्यामुळे गरजवंत मातंग समाजातील युवकांना या महामंडळाचा हवा तसा उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचकाठी रद्द करा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने मातंग समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जावा या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून मातंग समाजातील व्यावसायिकांना तसेच उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज वितरण केले जाते. याचा मातंग समाजासाठी उपयोग होत असला तरी मात्र या महामंडळाच्या कर्ज वितरणात काही जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीयकृत बँकेत आजपर्यंतचे झालेले व्यवहार, काही ठराविक रकमेसाठी सरकारी नोकरदार जामीनदाराची आवश्यकता आशा इतर काही जाचक आठी घालण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता आर्थिक व्यवहार बँकेत मोठमोठे होत असतील, किंवा बँकेत उलाढाल मोठी असेल तर खऱ्या अर्थाने या समाजातील त्या आर्थिक स्थर उंचावलेल्या लोकांना कर्जाची आवश्यकताच वाचणार नाही. ज्यांच्याकडे व्यवसायासाठी आर्थिक बाजू कमकुवत आहे अशीच लोकं कर्ज मागणी करीत असतात. मात्र या जाचक अटीमुळे त्यांना कर्ज घेताना अडचणी निर्माण होतात. शिवाय अशा आर्थिक स्थर कमकुवत असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरदार जामीनदार देखील होत नाही. त्यामुळे महामंडळाचा निधी किंवा महामंडळाच्या माध्यमातून बँकेकडून मिळणारा निधी पात्र आणि गरजवंत व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जाचक अटी रद्द कराव्यात.
मातंग समाजाच्या आर्थिक स्थर उंचावण्यासाठी ज्या हेतूने महामंडळाची स्थापना झाली त्या उद्देशाने समाजातील गरिबांनी गरजवंत घटकांना कर्ज मिळण्यासाठी या महामंडळाच्या कर्ज वितरणातील असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, राज्य उपाध्यक्ष असलम शेख, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, संपतराव मोहिते, विनायक क्षीरसागर, सागर जाधव सहशिष्ट्य मंडळांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
COMMENTS