अहमदाबाद (गुजरात): बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे सहा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 16 महिने बलात्कार केला. एका आरोपीने म...
अहमदाबाद (गुजरात): बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे सहा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 16 महिने बलात्कार केला. एका आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याच्या मित्रांनीही मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील एक मुलगा अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींपैकी एक राहुल शामलभाई फोफ याने इन्स्टाग्रामवरून युवतीसोबत (वय २०) मैत्री केली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपी राहुल पीडिताला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला होता. तेथे त्यांनी मुद्दाम अंगावर अन्न सांडून कपडे खराब केले. यानंतर तिला कपडे स्वच्छ करण्यास सांगून हॉटेलच्या खोलीत नेले. दरम्यान, ही तरुणी आपले कपडे काढून बाथरूममध्ये कपडे साफ करत असताना तिचा व्हिडिओ बनवण्यात आला.
व्हिडिओ बनवल्यानंतर राहुल याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने त्याचे मित्र दीपक नरसंगभाई फोफ, आशिष शामलभाई फोफ, जिगर गलबाभाई बोका, शुभम घेमरभाई भुताडिया आणि अज्ञात व्यक्तीला मिळून विद्यार्थिनीवर बलात्कार केला. आरोपींनी विद्यार्थिनीला नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत पालनपूर न्यू बस पोर्टच्या अनेक गेस्ट हाऊस आणि कॅफेमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर मुलीचा व्हिडिओही व्हायरल झाला. यानंतर युवतीने तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सर्व 6 आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS