मंचर दि.२४ फेब्रुवारी मंचर येथुन जाणारा नवीन सिन्नर महामार्ग सध्या अवैध धंदे करणारे परप्रांतिय आईसक्रीम, गाडया,खेळणी,घमेली रस्त्यालगत ,पु...
मंचर दि.२४ फेब्रुवारी
मंचर येथुन जाणारा नवीन सिन्नर महामार्ग सध्या अवैध धंदे करणारे परप्रांतिय आईसक्रीम, गाडया,खेळणी,घमेली रस्त्यालगत ,पुलाखाली लावून विक्री करत असुन अनेक गाडयांवर येणारे तीथे थांबुन खरेदी करत असल्याने वहातूकीस अडथळा व अपघात होण्याची शक्यता असल्याने स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट व काही जागरुक ग्रामस्थांनी मंचर पोलीसांशी संपर्क साधुन त्वरित कारवाई ची मागणी केल्यावर मंचर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कंकाळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कायगुडे, हेमंत मडके,कारभळ यांनी त्वरित पुलाखाली धंदा करत असलेल्या वहातुकीस सदर राजस्थानींच्या आईस्क्रीम, कलिंगडखेळणी विक्रीच्या गाडयांवर दंडात्मक कारवाई करत जीवन मंगल कार्यालयालयाशेजारील हायवेच्या पुलाचा श्वास मोकळा करून रहदारी सुरळीत केली.
यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी हे लोक एक रुपया भाडे , कुठलाही कर न भरता महामार्गावरच धंदा करुन कचरा अस्वच्छता पसरवत आहेत, वर अपघातात कारणीभूत होईल असा वहातुकीस अडथळा आणत आहेत, मराठी माणसांच्या पोटापाण्यावर पाय आणुन या परप्रांतीयांनी एकाबरोबर दहा दहा जण आणुन महाराष्ट्रालाच विळखा घालत आहेत, मराठी माणसांनी जाग्रुत होऊन परप्रांतीयांंकडुन खरेदी टाळुन स्थानिक दुकानदारांकडेच खरेदी करावे असे आवाहन केले.
याशिवाय परप्रांतीयांनी शासकीय, महामार्गावरील जागेत थाटलेली दुकाने त्वरित हटवावीत अशी मागणी करुन प्रा.अनिल निघोट यांनी मराठी माणसं,युवकांनीही केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातही पुढे यावे असे आवाहन करुन मंचर पोलीसांचे त्वरित कारवाईबद्दल आभार मानत यापुढे परप्रांतीय व महामार्ग वहातूकीस अडथळा ठरुन अपघातात कारणीभूत होणारांना अजिबात अवैध धंदे करु देऊ नका असे आवाहन पोलीस व महामार्ग व्यवस्थापनास केले.
COMMENTS