प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे उदघाटन लिज्जत पापड समूहाचे माजी व्यवस्थापक सुरेश कोते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सुरेश कोते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की,लिज्जत पापड समूह आज जवळपास ४० वर्ष काम करत आहे.व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून दर्जाशी कुठल्याही प्रकारची तोडजोड केली जात नाही.बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंवाद असे बदल व्यवसायामध्ये करायला हवे तरच मार्केटमध्ये आपण यशस्वीपणे उभे राहू शकतो.गुणात्मक दर्जा आणि विश्वासार्हता ही आमच्या लिज्जत पापडची नेहमीच खासियत राहिलेली आहे.अनुभवातून मिळालेले कौशल्य प्रत्येकाला यश मिळवून देते.कोणतेही शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाबरोबरच कौशल्य तितकेच महत्त्वाचे असते.आजच्या युवा तरुणांनी चांगल्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण अर्थकारण बळकटीकरणासाठी कृषी व फूड प्रोसेसिंग करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या विषयावर बोलताना प्रत्येक काम सातत्यपूर्ण,प्रामाणिकपणे आणि मनापासून करणे हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन रघुलीला इंनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रा.लि.पुणे चे संस्थापक विकास दांगट यांनी दुपारच्या सत्रात केले.
युवा उद्योजक प्रमोद दाभाडे यांनी व्यवसाय करताना कोणत्या कौशल्यांची गरज आहे याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी संभाषण कौशल्ये,व्यावसायिक कौशल्ये,नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये व वैश्विक मानवी मूल्ये या चार कौशल्यांची नितांत गरज असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
युवा शास्त्रज्ञ डॉ.प्रतिक मुणगेकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याचा उद्योग व्यवसायावर पडणारा प्रभाव या विषयावर चर्चाविनिमय करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वायु या संस्थेचे संस्थापक व आयआयटीयन प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी लघु व मध्यम उद्योजकता विकास व त्यासाठी आवश्यक कौशल्ये या संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पराशर कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यटन क्षेत्रातील रोजगार संधी व मनुष्यबळ व्यवस्थापनातील कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन केले.
उद्योग व्यवसायटील नितिमूल्ये या विषयावर मॅनेजमेंट गुरु प्रा.राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर कवी संदीप वाघोले यांनी व्याख्यान देऊन प्रेरणादायी कवितांचे वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्याच्या हेतूने व्यावसायिक प्रश्नमंजुषा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाचा अनुभव मिळावा यासाठी राजुरी येथील सात्विक डी फूड, एम आय डी सी वडगाव कांदळी येथील दाते पॉलिमर्स-प्लास्टिक इंडस्ट्री तसेच हस्ताई कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग यासारख्या विविध औद्योगिक वसाहती आणि लघु उद्योग समूहामध्ये औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या कौशल्य विकास कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातून १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.निलिमा फोकमारे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.कल्याणी शेलार,प्रा.गणेश बोरचटे, तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी मानले.
COMMENTS