जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिधापत्रिका पुरवठा शाखेत गेल्या महिनाभरापासून नागरिकांना हेलपाटे मारून काम होतं नसल्याचे चित्र आहे. पुरवठा विभाग...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिधापत्रिका पुरवठा शाखेत गेल्या महिनाभरापासून नागरिकांना हेलपाटे मारून काम होतं नसल्याचे चित्र आहे.
पुरवठा विभागादवारे राज्यभर अन्नधान्य वितरण प्रणाली तसेच ऑनलाईन शिधापत्रिकांची कामे केली जातात, यामध्ये नविन शिधापत्रिका काढणे, नविन नावे दाखल करणे, बदल करणे व पत्ता बदलणे याशिवाय इतरही कामे ऑनलाईन होतं असतात, मात्र यात तांत्रिक बिघाडामुळे लोकांना महिनाभरापासून नाहक त्रास सहन करावा लागतं आहे, वास्तविक जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातून व पूर्व भागातून लोकं रोज येतात मात्र काम न झाल्याने वैतागून लोकं घरी जातात, राज्यातील सर्वच पुरवठा शाखेतील सिस्टीम कोलमडल्यामुळे नागरिकांना विनाकारण या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतं आहे. येथील अधीकार्यांना विचारलं असता सिस्टीम बंद आहे उद्या या परवा या अशीच आश्वासने दिली जातात, मात्र समाधानकारक कामकाज होत नाही. वास्तविक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरच यावर तोडगा निघावा व लोकांची लवकर कामे व्हावीत अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
COMMENTS