प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ लॉ कॉलेज,समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव "युथ फॉर माय भारत" व "युथ फॉर डिजिटल लिटरसी" या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे ९ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.
या शिबिराचे उदघाटन राजुरी गावचे ग्रामनेते व पंचायत समिती चे माजी सभापती दिपकशेठ औटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष तसेच राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,शरदचंद्र पंतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे,अशोक औटी,तंटा मुक्ती चे अध्यक्ष मंगेश औटी,गणेश हाडवळे,ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले,रंगनाथ पाटील औटी,निलेश हाडवळे,सचिन औटी,नितीन औटी,ग्रामविकास अधिकारी संदीप ढोरे,दिलीप घंगाळे,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ बीसीएस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य संतोष घुले समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,प्रा.दिनेश जाधव,प्रा.अश्विनी खटींग,प्रा.कल्याणी शेलार,डॉ.सचिन भालेकर,प्रा.सोमनाथ गाडेकर,प्रा.अक्षदा मोरडे,प्रा.अजय भागवत,प्रा.सिद्धेश्वर वायसे,प्रा.विलास दातीर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिपकशेठ औटी म्हणाले की,हे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे असून समाजाभिमुखता जोपासण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.समाजाभिमुख तरुण घडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी म्हणाले की, ई-पिक नोंदणी यापूर्वीही सर्वोत्तम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर राजुरी गावामध्ये समर्थ संकुलातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. महसुली खात्यातील ७/१२,८अ फेरफार,तसेच इतर तत्सम आवश्यक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक वारसा,विविध संस्थांचे कार्य,शाळा,विद्यालये याबाबतची विस्तृत माहिती यावेळी त्यांनी शिबिरार्थींना दिली.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रिया हाडवळे यांनी सांगितले.
यावेळी वल्लभ शेळके यांनी या शिबिरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी या उपक्रमा अंतर्गत ई -पीक पाहणी,आधार कार्ड व मतदार नोंदणी व जनजागृती,अनेमिया (रक्तशय )बाबत तपासणी शिबिर,नशा मुक्त भारत व अन्नसुरक्षा व्याख्याने,बालविवाह रोखण्यासाठी पथनाट्य,स्त्री भ्रूण हत्या,रस्ता सुरक्षा,जलसंवर्धन,पर्यावरण संरक्षण,महिला सक्षमीकरण,वनराई बंधारा,अंधश्रद्धानिर्मूलन पर जनजागृती कार्यक्रम,योगासने,स्त्री-पुरुष समानता,व्यसनमुक्त भारत,माझी वसुंधरा अभियान,पोस्टर सादरीकरण,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,स्थानिक इतिहास लेखन,एक मूठ धान्याची उपक्रम,शालेय स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले.
या शिबिरामध्ये एकूण २७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.भुषण दिघे यांनी मानले.
COMMENTS