लाडकी बहिण योजनेमुळे (Ladki Bahin Scheme) राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत असून, शेतकरी कर्जमाफी योजनेची (farmer loan waiver) अंमलबजावणी करण्य...
लाडकी बहिण योजनेमुळे (Ladki Bahin Scheme) राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत असून, शेतकरी कर्जमाफी योजनेची (farmer loan waiver) अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुण्यात दिली आहे.
वर्षाला सुमारे 46,000 कोटी रुपये खर्च
लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahin Yojna) पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता दिला जातो. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या लाडकी बहिन योजनेसाठी राज्याला वर्षाला सुमारे 46,000 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे, असं सांगितल्या जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा परिणाम
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताणामुळे राज्याची अतिरिक्त रक्कम तयार करण्याची क्षमता बाधित झाली आहे. अन्यथा शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच झाली असती, अशी माहिती रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी दिली.
राज्याच्या क्षमतेवर परिणाम झाला
"लाडकी बहिन योजनेमुळे निर्माण झालेल्या बोजामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. असं कोकाटे म्हणाले. (Minister on Ladki Bahin Scheme)
चार ते सहा महिन्यांपर्यंत कर्जमाफी
आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत, आणि राज्याचे उत्पन्न वाढले की, आम्ही पुढील चार ते सहा महिन्यांपर्यंत कर्जमाफी योजनेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, " असं ते म्हणाले.
COMMENTS