नाशिक : मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प...
नाशिक : मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे.
शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शहा दाम्पत्याने विष सेवन आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शाह दाम्पत्याने आपल्या मुलासोबत काल रात्री जेवण केले. यानंतर पती आणि पत्नीने विष सेवन केले. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने शहा कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचे समजकाच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS