नारायणगाव : दिनांक १७ जानेवारी नारायणगावकडे ये असलेल्या प्रवासी वहातुक करणारी गाडीस आयशर ट्रकने मागुन धडक दिल्याने ती समोर बंद पडलेल्य...
नारायणगाव : दिनांक १७ जानेवारी
नारायणगावकडे ये असलेल्या प्रवासी वहातुक करणारी गाडीस आयशर ट्रकने मागुन धडक दिल्याने ती समोर बंद पडलेल्या एस.टी.वर आदळुन झालेल्या सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात आनंदवाडी येथे शाळेत चाललेल्या शिक्षिका मनिषा पाचारणे यांच्यासह दहा जणांचा म्रुत्यु ज्यात चार पुरुष चार महिला व दोन वर्षाच्या बालकाचा समावेश असुन, ज्यात प्रवासी वहातूक करणारा ड्रायव्हर चा पण म्रुत्यु झाला असुन तीन जण गंभीर जखमी झालेत.या भीषण अपघातात नऊ जण जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यात विनोद रोकडे चालक कांदळी,देऊबाई टाकळकर वैशाखखेडे,भाऊ बढे नगदवाडी कांदळी,युवराज वाव्हळ चौदा नंबर,चंद्रकांत गुंजाळ कांदळी,गिता गवारे चौदा नंबर, मनिषा पाचारणे चौदा नंबर, वशिफा इनामदार वय पाच खेड,नजमा शेख खेड हे जागीच ठार झाले असुन रुतुजा पवार चौदा नंबर, गणपत घाडगे कादळी,शुभम घाडगे कांदळी,मर्जना शेख खेड,आयशा शेख खेड,सखी पुंडे नारायणगाव, नफिम शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन सांत्वन व विचारपुस करून माझे माहेर कांदळी येथील माझ्या नातेवाईकांचाच मयत व जखमींमध्ये समावेश असल्याने दु:ख व्यक्त करत अपघातग्रस्तांच्या नातेवाईक व जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय व मॅक्सकेअर हॉस्पिटल अपघातस्थळ नारायणगाव येथे ही भेट दिली. पोलीस प्रशासन व दोन्ही रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज यंत्रणेद्वारे सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन महामार्ग व्यवस्थापनाने रस्त्याचे कडेला बंद पडलेली वहाने व परप्रातिय लोकांचे रस्त्यालगत विक्रीसाठी टाकलेली दुकाने ,वहातुकीस अडथळा ठरणारे दुकानांचे बोर्ड व वस्तू त्वरीत हटवुन अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
COMMENTS