मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
तसेच या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळनिर्णय राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सद्याच्या 'सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४' मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरु आहे.
या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे. मंत्रिमंडळनिर्णय प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणांमध्ये मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल महोदय यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती आदी बाबींसंदर्भात तरतुदीचा समावेश आहे.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये एमटीडीसीचे नवेगाव बांध पर्यटक निवास नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाभोवती शाश्वतरित्या उभारले असून ते पर्यटकांना पर्वणी ठरेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध पर्यटक निवासाचा लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने पार पडला.
अधिक वाचा
CrimeNama Live News : लाडक्या बहिणीसाठी गुड न्युज, आता प्रत्येक महिन्याला मिळणार 2100 रूपये.
शरद पवार अन उद्धव ठाकरे गटातून वाढलं आऊटगोइंग; एकनाथ शिंदेकडून मोठा धक्का!
COMMENTS