भारत सरकार (ने.यु.के.)संलग्न महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्स्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था पर्यावरण , व्यसन मुक्ती , महीला, कृषी, अपंग (दि...
भारत सरकार (ने.यु.के.)संलग्न महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्स्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था पर्यावरण , व्यसन मुक्ती , महीला, कृषी, अपंग (दिव्यांग) बेरोजगार ,वृध्द यासह उपेक्षित, वंचितासाठी काम करणारी राज्यस्तरीय संस्था जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर याच्या वतीने श्री गजानन महाराज शेगाव येथे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी .श्री संत गजानन महाराज व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलन शेगाव व जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर याच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील समाजातील उल्लेखनीय कामगिरी केली अश्या मंडळींचा राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री राधेश्याम सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप( जुन्नर पुणे)या संस्थेला राज्पातळीवर राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था व उत्कृष्ट रूग्ण सेवक मा.श्री उदय सिंह पाटील अध्यक्ष जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर श्री बाबासाहेब मेमाणे राज्य निवेदक अहमद नगर शेगाव नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बूच मॅडम.शिवसेना शहर अध्यक्ष शेगाव श्री संतोष लिप्ते डाॅक्टर शशिकांत जोशी व सिमाताई सुरोशे मॅडम संस्थापक अध्यक्षा इंदिरा बहुउदेशीय शि क्षण व प्रसारक मंडळ मालेगाव जि वाशिम व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले या वेळी कोल्हापूर संस्थाचे श्री उदयसिंह पाटील यांनी व्यसनमुक्ती विषयावर समज गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले तसेच समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी एकूण 35जणांना विविध पुरस्कार व कोल्हापूर फेटा ट्राफी तसेच पुरस्कार्थी चे तुयारी वाजवून सन्मानित करण्यात आले आहे संस्थेचे वतीने दर वर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचे सत्कार करण्यात येणारआहे असे सांगितले आहे या वेळी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व अरूण शेरकर अध्यक्ष सुनील कलोसिया संचालक कल्याण विभाग जय चव्हाण अलिबेग मिर्झा ,प्रसाद सुरोशे सौ.सुनिता चव्हाण मॅडम अश्विनी शेरकर मॅडम नयना लालबिगे साजिद जमादार दक्ष लालबिगे ध्रुव लालबिगे व पुरस्कार्थी आपल्या कुटुंबाबरोबर मित्रमंडळी सह उपस्थित होते या श्री दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष यांनी माहिती दिली की संस्थेचे कार्यकालातील सर्वात पहीले राज्यस्तरीय पुरस्कार हा संस्थेचे कार्य बघून संस्थेला मिळाला असून हा पुरस्कार सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व दिव्यांग विधवा परित्यक्ता अनाथ निराधार ,धुणीभांडी ,शेतमजूर कामगार ,शिवणकला प्रशिक्षणार्थी सर्व संस्था पदाधिकारी संस्थेचे हितचिंतकाच्या मुळे हा पुरस्कार आपल्या मुळे मिळाला आहे हा पुरस्कार सर्व जुन्नर तालुक्याला समर्पित करत आहे सर्वांना धन्यवाद आभार
COMMENTS