थोर स्वातंत्र्यसेनानी पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 वी जयंती निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा नगदवाडी ता.जुन्नर येथ...
थोर स्वातंत्र्यसेनानी पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 वी जयंती निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा नगदवाडी ता.जुन्नर येथे पूज्य साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या संस्कारक्षम आत्मकथन कादंबरीवर आधारीत संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे अध्यक्ष शामराव कराळे,कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील,कार्यवाह सुनील पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे,कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडे,कोषाध्यक्ष संतोष गडगे,कार्यवाह चांगदेव पडवळ,सल्लागार रमेश तांबे,मार्गदर्शक संजय डुंबरे,संचालक मंगेश मेहेर यांच्या सहकार्याने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेतील सर्व उत्तीर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,विद्या वाघ,मंगेश मेहेर,सुप्रिया अभंग,पंडित चौगुले,आशा आरेकर,उज्वला कांबळे व निलेश शेलार या शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाचे पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,केंद्रप्रमुख अशोक हांडे,नगदवाडीचे पालक,ग्रामस्थ यांनी कौतुक व अभिनंदन केले.
COMMENTS