बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात स...
बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. पोलिस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती. त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदलीनंतरही सातत्याने गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करत बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीमध्ये असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे काही फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर बीड पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ते केज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.
COMMENTS