आज दि.18/1/2025 रोजी पंचशील बुद्धविहार घोडेगाव येथे आयोजित जनरल मीटिंग मध्ये पुणे जिल्हा पदाधिकारी यांनी तालुका अध्यक्ष म्हणुन महेशभाऊ वाघ...
आज दि.18/1/2025 रोजी पंचशील बुद्धविहार घोडेगाव येथे आयोजित जनरल मीटिंग मध्ये पुणे जिल्हा पदाधिकारी यांनी तालुका अध्यक्ष म्हणुन महेशभाऊ वाघमारे यांचे नाव घोषित केले.
यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शिंदे कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले सचिव आतिष उघडे यांनी आंबेगाव तालुका कार्यकारी मंडळाची निवड पुढील प्रमाणे केली. अध्यक्ष महेशभाऊ वाघमारे, सरचिटणीस रविंद्र अभंग, कोषाध्यक्ष नरेश कसबे, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, तानाजी अस्वरे, आतिष ढोणे,सचिव पदी गणेश भालेराव, राजू शेवाळे, सुरेश शिंदे कार्यालयीन सचिव अनिल अभंग अशी निवड करण्यात आली.
यावेळी महिला विभाग तालुका अध्यक्षा मीनाक्षी वाघमारे, जया भालेराव, पूनम वाघमारे, सुनीता वाघमारे, सीता वाघमारे,संजय वाघमारे, गणपत सरोदे, प्रकाश वाघमारे, योगेश भालेराव, आदी मान्यवर उपस्थित होते. उर्वरित कार्यकारिणी लवकरच निवड करून जाहीर केली जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश वाघमारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान शिंदे होते सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले. आतिष उघडे, रविंद्र अभंग, मीनाक्षी वाघमारे. संजय वाघमारे, यांनी शुभेच्या मनोगत व्यक्त केले तर आभार नरेश कसबे यांनी मानले.
COMMENTS