लखनऊ : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या...
लखनऊ : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती.
पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलिस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात ही घटना घडली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घुरहू यादव याची पत्नी गीता देवी (वय 50) बेपत्ता होती. एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आली आणि सासू त्याच्यासोबत गाडीवर बसून गेली, असे तिची सून गुडियाने पती दीपकला सांगितले. गीतादेवी घरी न परतल्याने मुलगा आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला. घुरहू यादवने शुक्रवारी पोलिस स्टेशनला पत्नी गीतादेवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात शनिवारी सकाळी दरवाज्याजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीता देवीचा मृतदेह सापडला. टाकीचे झाकण उघडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. डोक्याला मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसपी संतोष मिश्रा यांनी एक पथक स्थापन केले. सून, मृत महिलेचा मुलगा आणि पतीची वेगवेगळ्या वेळी चौकशी केली असता, त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केली असता मृत महिलेचा पती घुरहू आणि सून गुडियाने गुन्ह्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू असल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. आठवडाभरापूर्वी गीता देवीने तिचा पती आणि सुनेला नको त्या अवस्थेत पाहिले होते. सून आणि सासऱ्याने सासूला मार्गातून हटवण्यासाठी कट रचला. गुरुवारी संध्याकाळी गीता देवीच्या डोक्यावर अर्धवट जळालेलं लाकूड आणि विटेने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. मग तिचा मृतदेह घरातल्या शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत लपवला. पोलिसांना हत्येसाठी वापरलेलं अर्धवट जळलेले लाकूड, विटेचा तुकडा, रक्ताने माखलेला लोकरीचा स्वेटर आणि सलवार सापडली. पोलिसांनी हे सर्व जप्त करून सासरा आणि सुनेची तुरुंगात रवानगी केली आहे.
COMMENTS