नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ चा भव्य दिव्य धार्मिक महोत्सव होत आहे. मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभात...
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ चा भव्य दिव्य धार्मिक महोत्सव होत आहे. मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभातील मुख्य विधींपैकी शाही स्नान पार पडणार आहे. यासाठी जवळपास कोट्यावधी भाविक प्रयागराज येथे दाखल होणार आहे. त्यामुळे देशातून,परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रस्ते रेल्वेसह, विमानसेवा देखील सज्ज करण्यात आली आहे. याचाच आढावा केंद्रीय नागरिक उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयागराज येथे जाऊन तयारींचा आढावा घेतला.
मुरलीधर मोहोळ यांनी प्रयागराज येथे जाऊन महाकुंभ २०२५ च्या भव्य धार्मिक महोत्सवाच्या काही दिवस आधी जाऊन आढावा घेतला. यावेळी मोहोळांनी त्रिवेणी संगमावर पुजाअर्चा केल्यानंतर समाधान व्यक्त केले. तसेच याठिकाणी येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. तयारी व्यवस्थित सुरू असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सर्व व्यवस्था पूर्ण क्षमतेने पार पडतील, अशी आशा मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, “मी विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून भाविकांच्या सोयीसाठी विमानतळावरील व्यवस्थांची तपासणी करणार आहे. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.”
महाकुंभासाठी 40-45 कोटी भाविकांची अपेक्षा
उत्तर प्रदेशचे मंत्री नंद गोपाल गुप्ता यांनी सांगितले की, महाकुंभसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या महाकुंभ महोत्सवात सुमारे 40 ते 45 कोटी भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. गुप्ता यांनी 2019 च्या कुंभ मेळ्याचा उल्लेख करत सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली 2019 चा कुंभ अत्यंत यशस्वी ठरला होता, आणि 2025 चा महाकुंभही तितकाच भव्य आणि यशस्वी ठरेल.”
सुरक्षा व्यवस्थांसाठी विशेष तयारी
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घोडेस्वार पोलिस तैनात करण्यासाठी वारंबूल्ड जातीचे पाच घोडे आणण्यात आले आहेत. हे घोडे गोंधळाच्या परिस्थितीत भाविकांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षित आहेत. बाजारमूल्य प्रति घोडा 1.5 कोटी रुपये असला तरी, हे घोडे प्रति घोडा 7 लाख रुपयांच्या दराने खरेदी करण्यात आले आहेत. या घोड्यांसोबत प्रशिक्षित पोलीस गस्त घालतील, जेणेकरून भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.
धार्मिक महत्त्व आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक
महाकुंभ हा प्रत्येक 12 वर्षांनी आयोजित होणारा पवित्र धार्मिक महोत्सव आहे. यामध्ये लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करून मोक्ष प्राप्तीची कामना करतात. महाकुंभातील मुख्य विधींपैकी शाही स्नान (मकर संक्रांती) 14 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. याशिवाय, इतर महत्त्वाचे स्नानाचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत. यात 29 जानेवारीला मौनी अमावस्या, तर 3 फेब्रुवारीला बसंत पंचमी आहे.
महाकुंभाचा समारोप हा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होईल. भाविक मोठ्या संख्येने या स्नान विधींमध्ये सहभागी होऊन पवित्र जलात स्नान करतील, ज्याला पापमुक्ती आणि मोक्ष प्राप्तीसाठी विशेष महत्त्व आहे. महाकुंभासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी तयारी वेगाने सुरू आहे. यामुळे हा महोत्सव भाविकांसाठी सुरक्षित, भव्य आणि संस्मरणीय होईल अशी अपेक्षा आहे.
अधिक वाचा
समर्थ संकुलामध्ये ग्राहक जागरण व जागरण पंधरवडा समारोप समारंभ संपन्न.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी मनसेचा वापर - संजय राऊत
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ, पेट्रोल-डिझेलसह "या" वस्तू महागणार.
COMMENTS