2017 साली बेंगळुरू येथील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना, सिटीगृपमध्ये बँकर असलेल्या अजय गोपिनाथ यांना सलाड प्लेटवर काही मायक...
2017 साली बेंगळुरू येथील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना, सिटीगृपमध्ये बँकर असलेल्या अजय गोपिनाथ यांना सलाड प्लेटवर काही मायक्रोग्रीन्स दिसले.
त्यांना मायक्रोग्रीन्स बद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी यावर रिसर्च सुरू केले. मायक्रोग्रीन्स म्हणजे भाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पतींची पहिली पालवी.
अजय यांनी 2020 साली, वयाच्या 48 व्या वर्षी, बँकिंगच्या नोकरीला राजीनामा दिला आणि कोचीला परत जाऊन मायक्रोग्रीन्सची शेती सुरू केली. “Grow Greens” नावाने कंपनी रजिस्टर्ड करून एर्नाकुलम येथे ऑफिस सुरू केले.
अजय यांनी आपले 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करत सेंद्रिय बियाणे, ट्रे आणि कोकोपिट खरेदी केले. सुरुवातीला त्यांनी 64 स्वे. फूट खोलीत एक रॅक ठेवून मायक्रोग्रीन्स उगवायला सुरुवात केली.
आज ते रोज 7-8 किलो मायक्रोग्रीन्स उगवतात. ते दर महिना 5 लाख रुपये कमावत असून त्यांच्या बिझनेसची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये आहे, आणि यावर्षी त्यांचे 60 लाख रुपये उत्पन्नाचे ध्येय आहे.
अजय यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये, मायक्रोग्रीन्सच्या फ्रँचायझीमध्ये 30 पेक्षा जास्त युनिट्स तयार केले आहेत. ते फ्रँचायझी सिस्टीममध्ये ट्रेनिंग आणि साहित्य पुरवतात.
त्यांच्या मायक्रोग्रीन्सची विक्री रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, योग केंद्रे आणि हॉस्पिटल्समध्ये केली जाते. मायक्रोग्रीन्सचे प्रोडक्शन विविध प्रकारच्या भाज्या, कडधान्ये आणि औषधी वनस्पतींपासून होते, ज्यामुळे त्यात अधिक पोषणतत्त्व मिळते.
अजय यांच्या मते, मायक्रोग्रीन्स फक्त सलाडमध्येच नाही, तर रोटी, भाकरी, सूप, इडली, डोसा आणि भाजीमध्ये देखील वापरता येतात. मायक्रोग्रीन्स फक्त 5 स्टार हॉटेल्समध्येच नाही तर सामान्य माणसांच्या आहारात देखील सामील होणे आवश्यक आहे.
COMMENTS