बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवा...
बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून, 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस यंत्रणा सरस ठरली असली तरी हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचंही दिसून येत आहे.
बीड जिल्हा पोलिस दलातील 2023/24 या वर्षातील कामगिरी समोर आली. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हत्येच्या गंभीर गुन्ह्यात घट झाल्याचे समोर आले आहे. 2023 या वर्षात बीड जिल्ह्यात खुनाचे एकूण 64 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 60 गुन्हे उघड आहेत. 2024 या वर्षात 40 खुनाचे गुन्हे दाखल असून सर्व गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. 2024 या वर्षात खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकूण 191 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 190 गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यावरुन, हत्येचा प्रयत्न झाल्याचे गुन्हे 2023 च्या तुलनेत वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीडचा बिहार झाल्याची टीका बीडमधील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. अंजली दमानिया यांनी एका वर्तमान पत्रातील बातमीचा संदर्भ देत परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत असल्याचे म्हटले. तसेच, एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. फक्त यामध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसते बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. तसेच, इकडे पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तेथील आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे, म्हणूनच मी परत परत म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा
पुणे | IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदाला कृष्णाने स्माईल दिली अन.
व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर महत्वाचे:दिपकशेठ औटी
COMMENTS