क्राईमनामा Live : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्याला प्रदेशाध्यक...
क्राईमनामा Live : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त करा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी काँग्रेसकडून युवा चेहरा देण्याच्या हालचाल सुरू झाल्या आहेत.
प्रदेशाध्यक्षांसाठी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील (Satej Patil), सांगलीतून विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे नाव आघाडीवर आहे. या दोघांपैकी एकाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 105 जागा काँग्रेसने लढवल्या. मात्र केवळ 16 जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. विधानसभेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहितआपल्याला पद मुक्त करा अशी मागणी केली.
COMMENTS