आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिवाळी निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक मुल...
आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिवाळी निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक मुलांनी सहभाग नोंदवला होता. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि स्वराज्यातिल किल्ले यांची माहिती व्हावी हा उद्देश ठेवून स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेचे बक्षीस वितरण बेल्हे येथील जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर या ठिकाणी करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज व सार्थक विनायक औटी
द्वितीय क्रमांक साई मधुसूदन लोहकरे
तृतीय क्रमांक ध्रुव व अपुर्वा अल्पेश सोनवणे यांनी मिळवला तसेच सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री.निवृत्ती हाडवळे सर यांनी केले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे अध्यक्ष अल्पेशभाऊ सोनवणे, कवी अशोक उघडे सर, कवी विजय भद्रिके तसेच विद्यार्थ्यांचे पालक विनायक औटी, अंजुम शेख, प्रियंका देशमुख, शितल खोमणे पुजा सोनवणे, उपशिक्षिका पुष्पा गुंजाळ मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कवी पाहुणे यांनी आपल्या कविता सादर करून विद्यार्थ्यांना खुश केले .आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अल्पेशभाऊ सोनवणे यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS