प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ अंतर्गत नारायणगांव बीटच्या बीटस्तरीय स्पर्धा ज...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ अंतर्गत नारायणगांव बीटच्या बीटस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा नगदवाडी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये धावणे,लांब उडी, उंच उडी, गोळा फेक,थाळी फेक, वक्तृत्व, बडबडगीते, कवितागायन, भजन, लोकनृत्य, मल्लखांब, लंगडी, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, लेझीम, आट्यापाट्या अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. १० व ११ तारखेला दोन दिवस स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती जुन्नरच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडीचे अध्यक्ष दिनेश बढे व सर्व सदस्य, शाळा सल्लागार समिती नगदवाडीचे अध्यक्ष सुरेश बढे व सर्व सदस्य,केंद्रप्रमुख अशोक हांडे, दिनेश मेहेर, दत्तात्रेय साबळे, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. नगदवाडी, हिवरे तर्फे नारायणगांव व वारूळवाडी या केंद्रातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पडल्या.नगदवाडी शाळेने लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर हिवरे तर्फे नारायणगांव शाळेने कबड्डी व मल्लखांब मध्ये बाजी मारली. मांजरवाडी शाळेने लेझीम व खोखो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.आनंदवाडी व वळणवाडी शाळेने लंगडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर ठाकरवाडी,वारूळवाडी,खोडद, पाटेखैरे मळा,देवाची जाळी, वडगांव कांदळी तसेच नारायणगांव नं.१,२ व ३ या शाळांनी या विविध स्पर्धामध्ये यश मिळवले.नगदवाडी केंद्रातील सर्व शिक्षकांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,कांदळी गावच्या सरपंच डॉ.पल्लवी भोर,ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी सर्वांचे आभार मानले.मंगेश मेहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
COMMENTS