जुन्नर : जुन्नर तालुक्यातील वर्दळीचे ठिकाण एसटी बस स्थानक आहे या बस स्थानकावर कामानिमित्त पश्चिम भागातून व पूर्व भागातून प्रवासी येत जात अ...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील वर्दळीचे ठिकाण एसटी बस स्थानक आहे या बस स्थानकावर कामानिमित्त पश्चिम भागातून व पूर्व भागातून प्रवासी येत जात असतात. सध्या महिला व महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील बस स्थानकावर बसण्यासाठी बाकडे आहेत मात्र या बाकड्यावर बसताना महिला, महाविद्यालयीन तरुणीना आपला जीव धोक्यात घालून बसावे लागतं आहे, कारण या बस स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात टवाळखोर मुले व काही मद्यपी बसत आहेत व महिला व मुलींकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतात, मागील काही दिवसांपूर्वी याच बस स्थानकात पिकअपचा स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्या स्टंट करणाऱ्याला पकडून जेलमध्ये घातले होते मात्र त्यानंतर पोलिसांनी बस स्थानकात दोन दिवस दक्ष राहून या टवाळखोरांना चाप दिला होता, मात्र नंतर पुन्हा बस स्थानक आवरात या टवाळ व रिकामटेकडे पोरं बसताना दिसत आहेत व तरुण मुली व शाळकरी मुलींवर घाण नजरेने पाहत असतात मात्र या गोष्टीची म्हणावी तितकी दक्षता पोलीस प्रशासन घेताना दिसत नाही, बस स्थानकातील कॅमेरे चेक करून असे फालतू पोरं व मद्यपी यांना पोलिसांनी लगाम लावावा अशीच क्राईमनामा लाईव्हच्या वतीने विनंती.
COMMENTS