पुणे शहरातील गंज पेठेतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आ...
पुणे शहरातील गंज पेठेतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केले असून, या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. लैंगिक प्रकरणात बालकांच संरक्षण करणाऱ्या 7,9, 11, 6, 12, 14 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार शाळेच्या स्टाफ रुममध्ये घडला. पीडित मुलगा दहाव्या इयत्तेत असून तो प्रिलियम परीक्षेसाठी शाळेत आला होता, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. हा सर्व प्रकार 27 डिसेंबर रोजी घडला.
आरोपी शिक्षिकेने (वय २७) विद्यार्थ्याला (वय १७) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला उत्तेजित केले व आपल्यासोबत स्टाफ रुममध्ये घेऊन गेली. शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टाफ रुममध्ये सुरु असलेल्या प्रकाराची माहिती मिळताच ते तिथे गेले व रंगेहाथ शिक्षिकेला पकडले. शाळा व्यवस्थापनाने मुलाच्या कुटुंबियांना या बद्दल कळवले. त्यानंतर मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी संबंधित शिक्षकेला अटक केली आहे. त्या दहावीतल्या विद्यार्थ्या बरोबर आपण शरीर संबध प्रस्थापित केल्याची कबुली संबधित शिक्षिकेने दिली आहे. तिचे मेडीकलही करण्यात आले आहे. त्यानंतर तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. दरम्यान, झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली. शिवाय झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. यावेळी पालकांनी झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही शाळेने घेतली पाहीजे अशी मागणी करण्यात आली आहे.
COMMENTS