जुन्नर : जुन्नर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी संविधान सन्मान धरणे आं...
जुन्नर : जुन्नर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी संविधान सन्मान धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात परभणी येथील युवा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांना बेकायदेशीर अटक करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील बेरोजगार युवकांना उद्योगधंदे व नोकरीची हमी मिळावी म्हणून ग्रामीण भागातील २८००० हजार ग्रामपंचायतीतून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र राज्यातील २ लाख ५० हजार सहकारी संस्था, बाजार समित्या, ८० सहकारी साखर कारखाने यामधून व शैक्षणिक संस्थामधून अनुसूचित जाती - जमातीचा अनुशेष भरण्यात यावा, ग्रामीण भागात सन्मान, संरक्षण, सवंर्धन मिळण्यासाठी सन्मानपूर्वक वातावरण निर्मिती करण्यात यावी, देशातील उच्च निच्चता जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची समिती तयार करून "आम्ही भारतीय सर्व, आता राबवू जयभिम पर्व" हि मोहीम गावागावात सुरू करण्यात यावी अशा मागण्याच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते, यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, या आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे, पोपट राक्षे -आर. पी. आय तालुकाध्यक्ष जुन्नर, सुरेश खरात - आर. पी. आय उपाध्यक्ष जुन्नर तालुका, वसंत साळवे - मातंग एकता आघाडी, मधुकर पांडुरंग काजळे माजी नगरसेवक जुन्नर नगरपरिषद व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS