आज दि. डिसेंबर २०२४ रोजी पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर येथील समर्थ मंगल कार्यालयामध्ये जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून ऑइल अँड नॅचरल गॅस कार्प...
आज दि. डिसेंबर २०२४ रोजी पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर येथील समर्थ मंगल कार्यालयामध्ये जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून व डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील १२० दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले . तसेच यावेळी शारीरिक अपंगात्वावर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करणाऱ्या यशस्वी दिव्यांग उद्योजकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. आयुष्यात अपंगत्व आले म्हणून खचून न जाता जिद्दीने उभे राहण्यासाठी डिसेंट फाउंडेशनने हा उपक्रम केला आहे.
जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून अनेक पर्यटन स्थळे या तालुक्यात आहेत. या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना फळे विक्री,थंडपेय विक्री,वस्तू विक्री अशा प्रकारचे विविध व्यवसाय करता येणार आहेत .अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या सायकलची मदत होणार आहे .अनेकांना दुसऱ्यावर अवलंबून न राहता आता स्वतःची कामे स्वतः करता येणार आहेत .
यावेळी २२९ दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर समाज कल्याण विभागाच्या वतीने युनिक डिसॲबिलिटी आयडेंटिटी कार्ड चे वाटप करण्यात आले.
तसेच स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिव्यांग लोकांना आवश्यक साहित्य साधने वाटप पूर्व तपासणी करून कृत्रिम हात पाय ,कॅलिपर, वॉकर व एल्बो स्टिक इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार असून , त्यासंबंधीची तपासणी व नाव नोंदणी देखील यावेळी करण्यात आली.
डिसेंट फाउंडेशन या संस्थेच्या आठ वर्षाच्या कामाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जगद्गुरुकृपांकित हभप डॉ.चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम ,माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे ,माऊली खंडागळे ,अंकुश आमले ,मोहित ढमाले ,गुलाब पारखे ,तुषार थोरात, बाजीराव ढोले, संभाजी काळे ,गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे ,सकाळ समूहाचे गणेश कदम ,दत्ता जाधव ,दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे ,दिव्यांग वित्त महामंडळाचे निरीक्षक सविता मोरे ,न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालयाच्या संस्थापिका जाई खामकर, स्पार्क मिंडा फाउंडेशनचे डॉ. सुमेध लव्हाळे ,अर्चना भुजबळ ,एकनाथ डोंगरे ,दीपक चव्हाण व पुष्पा गोसावी आदी मान्यवर, दिव्यांग बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे यांनी केले तर प्रास्ताविक डिसेंट फाउंडेश्नाचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले व आभार संस्थेचे सचिव एफ.बी.आतार यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई ,उपाध्यक्ष योगेश धर्मे ,आदिनाथ चव्हाण ,संतोष यादव ,अरुण गवंडी ,गणेश मेहेर, शिरीष डुंबरे, बाळासाहेब खिलारी ,योगेश वाघचौरे, अशा सेविका व श्री समर्थ लेझीम पथकाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
COMMENTS