विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेण्यास सुरूवात केलीय. अशातच संसदेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सा...
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेण्यास सुरूवात केलीय. अशातच संसदेत आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा काढत पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यावरून आता महाविकास आघाडीत ठाकरे गटाची पुन्हा कोंडी झाली आहे. आता सावरकरांच्या मुद्यांवरून भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात संसदेत आज जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. संविधानावर चर्चा सुरू असतांना संसदेत श्रीकांत शिंदे यांनी इंदिरा गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सावरकरांविषयी इंदिरा गांधी यांचं काय मत होते ? ते विचारले. याच दरम्यान विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. तरीदेखील श्रीकांत शिंदे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.
श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असतांनाच विरोधकांनी मोठा गदारोळ केला आणि राहुल गांधींना बोललण्याची विनंती केली. यामध्ये कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी राहुल गांधी यांना बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ते म्हणाले की, मी लहान असताना इंदिरा गांधींना याबाबत विचारलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, सावकरांनी ब्रिटिशांशी तडजोड केली होती. गांधीजी जेलमध्ये गेले, नेहरू जेलमध्ये गेले आणि सावरकरांनी माफी मागितली होती. त्यावर देखील शिंदेंचं समाधान झाले नाही.
विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक केलेली आहे. महाराष्ट्रातील कांग्रेस नेत्यांमध्ये त्यांना शहाणपणाचे चार शब्द सांगण्याची धमक कधी नव्हतीच. परंतु पुन्हा एकदा हिंदुत्वाची भगवी शाल ओढण्याच्या तयारीत असलेल्यांना, कणा असल्याचे सिद्ध करण्याची ही संधी आहे. अशी टिका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
COMMENTS