कराड - पाडळी( केसे )तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराड येथील कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्सा...
कराड - पाडळी( केसे )तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराड येथील कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभीर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संविधानातील उद्देशिकेचे वाचन ही करण्यात आले. यानंतर कराड तालुक्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर आणि कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे -भंडारे यांना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, भीम आर्मी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी नगरपालिका कराडचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम थोरवडे, प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष संपतराव मोहिते, आदर्श माता प्रतिष्ठानचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दीपक मोहिते, विजापूर जिल्हाध्यक्ष लालसाहब शेख, भीम आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पाडळी (केशे) ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष अनिकेत सोनावले, सागर काटे, अनिल बडेकर, जयसिंगराव गोखले सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS