राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि यासाठी आता प्रचार करण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी तसेच महा...
राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि यासाठी आता प्रचार करण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी तसेच महायुती या दोन पक्षातील नेते आता प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत.
अशातच महायुतीने एक संयुक्त सभा घेतलेली आहे. ही सभा कोल्हापूरमध्ये पार पडली आहे. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिलेली आहे. ही सभा 5 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर या ठिकाणी झालेली आहे. ही एक ऐतिहासिक सभा झालेली आहे. 1995 झाली बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणावरूनच प्रचाराला सुरुवात केलेल होती. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दहा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितले की, "आई अंबाबाईने आम्हाला नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे. आज देखील अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही इथ येऊ." आता एकनाथ शिंदे यांनी कोणत्या घोषणा केलेल्या आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दहा महत्त्वाच्या घोषणा
लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. 15000 वरून ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांचा पोलिस दलात समावेश करणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये मिळणार आहेत. तसेच एमपीएस वर 20 टक्के अनुदान देण्यात येते देखील सांगण्यात आलेले आहे.
प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि निवारा देण्याचे आणि गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.
वृद्ध पेन्शनधारकांना आता दर महिन्याला 2100 रुपये देणार आहेत. सुरुवातीला ही रक्कम 1500 रुपये एवढी होती.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार आहे. असे देखील सांगण्यात आलेले आहे.
25 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच प्रशिक्षणातून दर महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देखील देण्यात येणार आहे.
45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार आहेत. असे देखील सांगण्यात आलेले आहेत.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15000 रुपये वेतन आणि संरक्षण देण्याचे सांगितले आहे.
त्याचप्रमाणे वीज बिलामध्ये 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 100 दिवसाच्या आत सादर करणार आहे.
COMMENTS