प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात २६ नोव्हे...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या हस्ते संविधान स्तंभाचे पूजन करण्यात आले.विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून अभ्यासामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.
आज संपूर्ण देशभरात संविधान दिवस साजरा केला जात आहे.समर्थ संकुलात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला होता.तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आले होते.संविधानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये संविधान दिवस साजरा केला जातो.
संविधान म्हणजे भारताचा आत्मा,भारतीयांची अस्मिता,भारताची शान,मान,सन्मान प्राण.या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लोकशाहीला संविधानरूपी अलंकाराने सजवले.संविधान हेच भारताच्या सहिष्णुतेचे व राष्ट्रीय एकात्मकतेचे गमक आहे.भारतातील नागरिकांचा न्याय,समता,स्वातंत्र्य आणि एकजूट यांचे रक्षण कारण्यासाठी संविधानातून स्वतंत्र,साम्यवादी, धर्मनिरपेक्ष,स्वायत्त,प्रजासत्ताक राज्य बनवण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत.या सर्वांची माहिती व जाणीव आजच्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने हा संविधान दिवस शाळा महाविद्यालयातून साजरा होत असतो असे मत कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी मांडले.यावेळी संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,लॉ कॉलेजचे प्रा.शिवाजी कुमकर,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलाईजेशन सेलचे संचालक डॉ.प्रतीक मुनगेकर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ.शरद पारखे तसेच सर्व विभागांचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.
COMMENTS