मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्यामुळे महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे...
मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्यामुळे महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे.
सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करत होत्या. मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि त्यांचे शीर धडावेगळ झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मजुर महिलांना एकच खळबळ उडाली.
कोकिलाबाई यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. शेतीत भागत नसल्याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते. कोकिळाबेन यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS