घोडेगाव दि ४ नोव्हेंबर प्रा.सुरेखाताई अनिल निघोट शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुका महिला आघाडी संघटिका, शिवसेनेची रणरागीणी म्...
घोडेगाव दि ४ नोव्हेंबर
प्रा.सुरेखाताई अनिल निघोट शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुका महिला आघाडी संघटिका, शिवसेनेची रणरागीणी म्हणून ओळख, सामान्य माणसं, स्वाभिमानी शिवसैनिकांसाठी अहोरात्र धावुन जाणारं व्यक्तीमत्व, शिवसेनेकडुनच लढणार, म्हणून मातोश्री वारी केली,पण सगळंच राष्ट्रवादीनं घेतल्याने शिवसेनेचे अस्तित्व अन शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी१९६ आंबेगाव विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात, तीस वर्ष एकनिष्ठ शिवसैनिकावर अपक्ष उमेदवारीची वेळ पण अंगठी चिन्हावर लढणार अन महिला, युवक,सामान्य मतदारांच्या साथीने जिंकुन आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकवणारच असा निर्धार सुरेखाताई निघोट यांनी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अन्यायाविरुद्ध लढा या संदेशाप्रमाणे गद्दारीनंतर संपूर्ण आंबेगाव शिरुर मतदारसंघातील १४२ गावात महिला आघाडी संघटिका म्हणून शिवसैनिकांना बरोबर घेऊन घरोघरी, विविध यात्रा उत्सवांस भेटी देउन तसेच शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख या नात्याने अनेक गावात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ, आंबेगाव भुषण -समाज भुषण पुरस्कार, पत्रकार सन्मान, कारसेवक शिवसैनिक सत्कार, ज्येष्ठ शिवसैनिक सत्कार, महिलासाठी होम मिनिस्टर, युवकांसाठी कबड्डी व क्रिकेट स्पर्धांद्वारे, नाराज शिवसैनिकांना घरी भेटुन शिवसैनिक तितुका मेळवावा शिवसेना धर्म वाढवावा म्हणून पदरमोड करुन लाखो रुपये खर्च करुन शिवसेना वाढवली ,पण तिकीट तर सोडा, पक्षाकडून कामाची दखल न घेता एकनिष्ठ शिवसैनिकावर अपक्ष रहाण्याची वेळ आली,शिवसेना संपवण्याचा हा डाव बरोबर येतील त्या शिवसैनिकांसह भगवा खांदयावर घेऊन आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकवुन हा विजय मातोश्री वर आमचे पक्षप्रमुख ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी ठेवुन त्यांचे आशीर्वाद घेणार, ईतर पक्षांकडून लढण्यासाठी विचारणा झाली पण कुणा ईतरांचं प्यादं म्हणुन नाही तर आजन्म शिवसैनिक म्हणून रहायचंय ,म्हणून शिवसैनिकांनी सामान्य माणसांनी साथ दयावी असे आवाहन सुरेखाताई निघोट यांनी केले.
COMMENTS