प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) पुणे (दिनांक : २७ऑक्टोबर २०२४) भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
पुणे (दिनांक : २७ऑक्टोबर २०२४)
भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय पुणे शहर विगाचे कविसंमेलन पुणे शहरात गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाले.
या कविसंमेलनास रसिक आणि कवी यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळपास १०० फुले प्रेमी कवी कवयित्रीनी आपल्या कविता सादर केल्या.पुणे , नांदेड,सातारा, सांगली,नाशिक, सोलापूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ नागपूर कोल्हापूर,बेळगाव, अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील तसेच अगदी तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपल्या अतिशय सुंदर, वैविध्यपूर्ण, प्रबोधनपर रचना सादर केल्या. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडयात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, घराघरात पोहोचावा या एकमेव उद्देशाने भिडेवाडा काव्य जागर अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या जिल्हास्तरीय कविसंमेलनांचे आयोजन आणि नियोजन केले आहे, असे या अभियानाचे जनक आयोजक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.
या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संमेलननात सहभागी सर्व कवयित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारखी वेशभूषा करून आल्याने एक आनंददायी व प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यातील गुलटेकडी येथील विमलाबाई लुंकड शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेवर अतिशय भारदस्त प्रबोधनपर पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. शाळेच्या शिक्षिका वर्षा शिंदे यांनी त्या संदर्भात मार्गदर्शन केले होते.
पुण्यातील या कविसंमेलनात
आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाचे
जनक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव
यांनी साधना शेळके पुणे , प्रतिभा कीर्तीकर्वे पुणे, उमेश शिरगुप्पे - गोवा, मनोज भारशंकर - अबुधाबी, नंदा मघाडे - जळगाव, पूनम पाटील - जळगाव,
या फुलेप्रेमी कवींना
आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार जाहीर केला.
कविसंमेलन मोफत विनामूल्य होते. चहा, नाष्टा, जेवण इत्यादी सुविधा सर्व कवींना मोफत पुरवण्यात आल्या.
कविसंमेलनाचे प्रास्ताविक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी तर सूत्रसंचालन सरिता कलढोणे, कांचन मून, तेजश्री पाटील,आणि कविता काळे यांनी केले; तर आभार प्रदर्शन साधना शेळके यांनी केले.
COMMENTS