प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलि...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे व युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युनिक अकॅडमी चे केतन कुमार पाटील व गोविंद हिबारे उपस्थित होते.
यावेळी तज्ञांनी विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीने सामोरे जावे,तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
केतन कुमार पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यांचा वापर आपले करिअर घडवण्यासाठी करावा.बदल छोटा असला तरी त्याचा प्रभाव हा संपूर्ण समाजाच्या हिताचा असतो,म्हणून नाविन्यपूर्ण बदल घडविणे काळाची गरज आहे व हे बदल घडविणे हे सर्वसामान्य विद्यार्थी देखील करू शकतात अश्या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
गोविंद हिबारे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे बँकिंग क्षेत्राचे महत्व,विविध संकल्पना आणि त्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी करावयाची तयारी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात तसेच कोणत्याही परीक्षांना सामोरे जाताना संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,संस्थेचे सचिव विवेक शेळके,संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,बीसीएस विभागाचे विभागप्रमुख प्रा.निलेश गावडे,बी बी ए,बी.कॉम विभागप्रमुख प्रा.गणेश बोरचटे, बीसीए विभागाचे विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काशीद तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी सूत्रसंचालन गणित विभागप्रमुख प्रा.दिपक साबळे यांनी तर आभार प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.
COMMENTS