विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस समर्थक स...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस समर्थक समरजीत घाटगे यांच्या पाठोपाठ दुसरे समर्थक शिवाजी पाटील शरद पवार यांच्या गळाला लागल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
गतवेळी शरद पवार यांनी एकेकाळी सहकारी राहिलेले नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्याशी झालेले मतभेद विसरून राजेश पाटील यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. मात्रं आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवार यांनी फडणवीस समर्थकाना इलेकटिव्ह मेरीठ पाहून तुतारी फुंकणेसाठी चाचपणी चालवली आहे. गडहिंग्लज उपविभागातील या राजकीय ट्विस्टमुळे महायुतीला धक्का बसला आहे. दरम्यान डॉ. नंदाताई कुपेकर बाभूळकर आणि माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांची मात्र गोची होणार आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाने इचलकरंजी मधील भाजपातील नाराज गट देखील तुतारी च्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता कोल्हापुरात शरद पवार भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजी पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या भूमिके कडे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हयातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होत आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेते शिवाजी पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे. कागलमधून समरजीत घाटगे यापूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत. आता चंदगडमधून शिवाजी पाटील, शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. भाजपा कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही? असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय नसल्याने भाजपाला खिंडार पडत असल्याची चर्चा आहे. कागल पाठोपाठ गारगोटी, चंदगड मध्ये भाजपाला धक्का बसला आहे . आत्ता जोरदार धक्का इचलकरंजी मध्ये ऐनवेळेस बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाजी पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. येत्या काळात शिवाजी पाटील हे काय भूमिका घेतात? शरद पवार गटात प्रवेश करतात का? हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान माजी मंत्री भरमू अण्णा पाटील गटाची भूमिका देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय होणार अशी विचारणा केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गडहिंग्लज उपविभागातील चंदगडचे राजकारण ढवळून निघाले आहे.
COMMENTS