आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महायुती आणि महा...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) चर्चा सुरु आहे.
अशातच आता काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपात (BJP) गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरु केलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar Politics News) पद्माकर वळवी यांची आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे. वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिले तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत. मला चांगली संधी मिळाली तर त्या संधीचा मी फायदा घेणार. यामुळे पद्माकर वळवी हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. अशातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहादा- तळोदा मतदार संघ (Shahada Taloda Assembly Constituency) किंवा अक्कलकुवा- अक्राणी या मतदार संघातून (Akkalkuwa Assembly Constituency) लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे. मात्र येणाऱ्या काळात कोणता पक्ष वळवी यांना तिकीट देणार त्यानुसार पुढचे राजकीय समीकरण असणार आहे.
COMMENTS