राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे डावपेच खेळले जात आहेत. कोणता नेता कोणत्या क्षणी कुठल्या पक्षात ज...
राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे डावपेच खेळले जात आहेत. कोणता नेता कोणत्या क्षणी कुठल्या पक्षात जाईल सांगताच येत नाही. अशा प्रकारच्या अनेक रणधुमाळी सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत.
दरम्यान , सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे उभय नेत्यांमध्ये बैठक संपन्न झाली.
पुढील काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांत जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीत मोहोळ विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्यामुळे मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. सध्या मोहोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने करीत आहेत.
COMMENTS