राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत्या विधानसभेत पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार असा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Comm...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत्या विधानसभेत पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार असा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राजीव कुमार यांनी आढावा बैठकीनंतर दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर उत्तरे दिली.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह यावरून दोन्ही गटात संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल देत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचे निरीक्षण नोंदवले.
त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अजित पवारांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केले. ज्यामुळे शरद पवार गटाने सर्वेाच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाचा निकाल लोकसभेदरम्यान लागला नसल्याने शरद पवारांना तुतारी चिन्हांवर आणि ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या नावावर निवडणूक लढवली.
अजित पवारांना (Ajit Pawar) कोणतं चिन्ह?
दरम्यान अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून कोणते चिन्ह दिले जाणार असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांना एका पत्रकाराने दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत विचारला असता. कुमार म्हणाले की, अजित पवारांच्या गटाला विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणते चिन्ह मिळणार हे सांगणे उचित ठरणार नाही. कारण चिन्हाच्या अधिकाराबाबतचा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सर्वेाच्च न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय घेईल.
याविषयी मी कोणतेही भाष्य करणार नाही, असे ते म्हणाले.
COMMENTS