बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खट...
बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे.
बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे (वय २३) 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीने त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीने शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असे चिमुकलीचे वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय. सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्याने पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे उघड झाले. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचे त्यांना समजले. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे ठरवले. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
COMMENTS