प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी राजूर , ता. जुन्नर, जि. पुणे येथे जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आयुष अ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी राजूर , ता. जुन्नर, जि. पुणे येथे जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर ( आयुष ) राजुर पथक, ग्रामपंचायत राजूर व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, मूत्ररोग, स्त्रीरोग, बीपी, शुगर, ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात ११२ नागरिकांनी सहभाग घेतला असून रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले असून ऑपरेशन,प्रवास,निवास, जेवण ,औषधे व चष्मे मोफत दिले जाणार आहेत. तसेच ज्यांना हृदयविकार अथवा मूत्ररोगाशी संबंधित आजार आहेत अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया ऑपरेशन हे श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ. बी. आतार,माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मुंढे, सरपंच जोत्सनाताई मुंढे,सदस्य संदीप मुंढे,संगीता पठारे,हिराबाई मुंढे,चैत्राली केंगले,पोलीस पाटील रामदास मुंढे,शशिकांत घायतडके,शंकरा आय हॉस्पिटल चे शिबीर समन्वयक प्रकाश पाटील व टीम , श्री हॉस्पिटल चे शिबीर समन्वयक संतोष शिंदे, डॉ.नागरगोजे व टीम, राजूर पथक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप गोसावी, डॉ. विजया गावित, आरोग्य सेविका रंजना कदम,अलका मुंढे,आरोग्य सेवक सुनील पवार,संदीप मुंढे,अत्रे,शेंडगे,शिक्षक, अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रदीप गोसावी यांनी केले तर आभार सरपंच जोत्सना मुंढे यांनी मानले.
COMMENTS