जुन्नर तालुक्यातील पांगरीमाथा येथे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मयूर संतोष केदार रा. सितेवाडी व निलेश शांतारा...
जुन्नर तालुक्यातील पांगरीमाथा येथे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मयूर संतोष केदार रा. सितेवाडी व निलेश शांताराम कवटे रा. सितेवाडी हे दोघ तरुण गंभीररित्या जखमी झाले होते सदरील तरुण अपघातानंतर रस्त्यावर पडले असताना तडफडत होते पण मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते बराच वेळ हे तरुण रस्त्यावर पडून होते त्यावेळी जुन्नरच्या मार्गाने जात असलेले आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी सदरील अपघात झाल्याचे पाहिले असता गाडी थांबवली व मदतीसाठी धावले ताबडतोब ॲम्बुलन्सला फोन केला त्यानंतर लगेचच दोन ॲम्बुलन्स दाखल झाल्या देवराम लांडे व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने या युवकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान मयूर केदार याचा मृत्यू झाला आहे व निलेश कवटे याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशा प्रकारचे अपघात होत असताना मदतीसाठी मात्र नागरिक पुढे येत नाही ही खेदजनक बाब आहे सदरील तरुणाला वेळेत उपचार भेटले असते तर तो वाचला असता अशी खंत देवराम लांडे यांनी व्यक्त केली अपघात कसा घडला याबाबतचा तपास पोलीस प्रशासन करत आहेत.
COMMENTS