लाखणगाव दि २७ जुलै शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा लाखणगाव च्या वतीने जि.प.शाळा आणि हायस्कूल मध्ये खाऊवाटप करून पक्षप्रमुख उद्धव बाळास...
लाखणगाव दि २७ जुलै
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा लाखणगाव च्या वतीने जि.प.शाळा आणि हायस्कूल मध्ये खाऊवाटप करून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला , त्यांनी ऊद्धव साहेब ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून कोरोना महामारीत महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील नागरीकांना वाचवण्याचं काम केले, आदर्श मुख्यमंत्री म्हणून देशात पाचवा क्रमांक मिळविला, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली गेली, शिवाय अन्नदात्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, त्यांना पुढील काळात परत मुख्यमंत्री झालेले शिवसैनिकांना पहायचे असुन कर्तृत्ववान, संवेदनशील नेतृत्व असलेल्या ऊद्धवसाहेबांनी आंबेगाव शिरूर विधानसभा शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढवण्याची संधी सामान्य शिवसैनिकास द्यावी अशी विनंती केली.
संयोजक विभागप्रमुख माउली पाटील, बाळासाहेब रोडे मा सरपंच नरेंद्र अण्णा भागवत, मार्तंड टाव्हरे, उपविभागप्रमुख विकास गायकवाड,सोसायटी संचालक बबनराव चौगुले,माजी चेअरमन महेश भोजने, संतोष अरगडे,संदिप मिंडे, रामदास पोंदे, कैलास गाढवे,पत्रकार विनायक कानसकर,, विठ्ठल कानसकर,मार्तंड भागवत,योगेश पाटील व भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS