ता:६ जुलै ;कुमशेत: जि. प.प्राथ. शाळा कुमशेत,ता. जुन्नर येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत या आठवड्यातील डॉ.दिनाचे औचित्य साधून डॉ.आपल्या भेट...
ता:६ जुलै ;कुमशेत:
जि. प.प्राथ. शाळा कुमशेत,ता. जुन्नर येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत या आठवड्यातील डॉ.दिनाचे औचित्य साधून डॉ.आपल्या भेटीला उपक्रम निमित्ताने व कै.आर्किटेक्चर चैतन्य धनंजय डुंबरे यांच्या स्मरणार्थ चाईल्ड केअर फाउंडेशन जुन्नर आयोजित मोफत बाल आरोग्य चिकित्सा शिबीर व मार्गदर्शन घेण्यात आले.
डॉ.सचिन डुंबरे बालरोगतज्ञ
यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता,सकस पौष्टिक आहार ,चांगल्या सवयी,खेळाचे महत्त्व संदर्भात मार्गदर्शन केले.
लायन्स क्लब शिवनेरी जुन्नरचे अध्यक्ष डॉ.भास्कर डुंबरे, चाईल्ड केअर फाउंडेशन सदस्य धनंजय डुंबरे, सौ.साधना डुंबरे,रेवा डुंबरे,ग्रीष्मा डुंबरे, परिवार उपस्थित होता.
आर्किटेक्चर कै.चैतन्य धनंजय डुंबरे यांच्या स्मरणार्थ
शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला वही, शैक्षणिक साहित्य, पुस्तके,वजन उंची तक्ता, अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ढोकळा व चाॅकलेट देऊन
डॉक्टर आपल्या भेटीला हा उपक्रम बालचमुंसमवेत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी कुमशेत गावचे सरपंच रविंद्र डोके,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलम इनामदार, शा. व्य.स.सदस्य चेतन भगत , शा. व्य. स.स.गणेश डोके,अंगणवाडी ताई सुलोचना डोके, संजीवनी नाईकवाडी, स्वयंपाकी वैशाली डोके, औटी, मुख्याध्यापक यशवंत घोडे सर,उपशिक्षक श्याम लोलापोड सर, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS