नारायणगाव ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम नुकताच नारा...
नारायणगाव
ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम नुकताच नारायणगाव या ठिकाणी संपन्न झाला.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख मंगेश मेहेर,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कवडे,रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रवींद्र वाजगे,नारायणगाव विभाग प्रमुख शांताराम डोंगरे, रियाज मोमीन, मनोहर भोसले,ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खजिनदार विजय नागरे, सचिव साईनाथ कनिंगध्वज,माजी अध्यक्ष शरद शिंदे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपसभापती अविनाश शिंगोटे, संचालक सचिन मुळे, ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीतील उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना "गुणवंत विदयार्थी पुरस्कार-2024" देऊन सन्मानीत करण्यात आले. शरयु मनोहर वायकर,श्रीनील श्रीकांत भालेराव,ईश्वरी अविनाश शिंगोटे,प्रज्वल विजय नागरे,अमेय सुनील पाटील,जान्हवी गुणवंत इंगळे,साई संतोष बाळसराफ, सार्थक निलेश सरोदे व साई सचिन मुळे या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच अनुष्का अंबादास वामन, स्वयंम सुनील हाडवळे ,सानिका शामराव बटवाल, अथर्व रंगनाथ पवार व विशाखा विकास कानडे
या बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रज्वल विजय नागरे, शरयू मनोहर वायकर, सार्थक निलेश सरोदे, अथर्व रंगनाथ पवार, जान्हवी गुणवंत इंगळे, साई संतोष बाळसराफ, साई सचिन मुळे, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच मंगेश मेहेर,रमाकांत कवडे,रवींद्र वाजगे,ज्ञानेश्वर शिर्के, मिलिंद औटी, सुरेश गडगे, राजश्री वायकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे खजिनदार विजय नागरे यांनी केले तर आभार सचिव साईनाथ कनिंगध्वज यांनी मानले.
COMMENTS