सह्याद्री पर्वतातील निसर्गात नाना प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगामध्ये सर्वत्र आढळणारी वनस्पती म्हणजे हिरडा त्य...
सह्याद्री पर्वतातील निसर्गात नाना प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगामध्ये सर्वत्र आढळणारी वनस्पती म्हणजे हिरडा त्याच्या झाडाला ग्रामीण भागात हिरड म्हणतात.
हिरडा फळाचा उपयोग औषध निर्मिती,रंग निर्मिती,कातडी कमावण्याच्या उद्योगासाठी उपयोग केला जातो त्यामुळे बाजारपेठ मध्ये त्याला खुप मोठी मागणी आहे.आदिवासी बांधवांचे उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे.
उपजिविकेचे साधन आहे.
हिरड्याचे प्रकार..बाळ हिरडा,रंगारी हिरडा,सुरवारी हिरडा,लेंडी हिरडा,शेंगुळी हिरडा,खारकी हिरडा,घोपरी अशी अनेक नावे आहेत.
झाडाची खोडे मोठं असते पसरट किंवा उंच फांद्या असतात.फुले सफेद पिवळी असतात.फुलोऱ्यातून मधमाशा मध गोळा करतात हे मध खुप उपयुक्त औषधी असते.
तोडणी पासून ते व्यापाऱ्यांपर्यत विकणे काही खुप कष्ट घ्यावे लागतात.
साधारण मे महिन्यात भर तप्त उन्हाळ्यात कोवळा बाळ हिरडा,कळी हिरडा पिकाची तोडणी झोडणी वेचणी हंगाम सुरू होतो. मुठभर हिरड्यासाठी उन्हा तान्हाची पर्वा न करता रानोमाळ डोंगर दऱ्याखोऱ्यात काट्याकुट्यातून वणवण भटकंती करावी लागते.त्याला मावळात पैशाचे झाड म्हणतात.आदिम काळापासून पिढ्यानपिढ्या हिरड्याचा उपयोग चा वापर उपयोग होत आहे.
किंवा शेत मालकीतील हिरडे राखणी करुन वेचावे लागतात.हिरडीच्या झाडावर चढून हिरडे वेचणे खुडणे सोपे काम नाही.झाडाच्या शेंड्या पालवावर जाऊन आपला तोल सांभाळून हिरडे तोडणे खुप अवघड काम असते.
काही झाडांची खोडे फांद्या दणकट पसरट असतात तर काही झाडे खुप उंच वाकडी तिकडी असतात . झाडावर चढून टाॅवेल,शाली ,उपरणे,किंवा फडकीची ओटी करुन एक एक कळी किंवा घोपर खुडून तोडावे लागतात. एका ओटीत चार पाच किलो हिरडे मावतात ओटी भरल्यानंतर पुन्हा झाडावरून खाली उतरावे लागते.वेचलेले खुडलेले हिरडे गोणीत किंवा पोत्यात ओतल्यावर पुन्हा पुन्हा झाडावर चढून उतरून दिवसभर हिरडे वेचावे लागतात.
वाऱ्याच्या झोका बरोबर तोल सांभाळावा लागतो. सतत सावध जागृक राहावे लागते.बेसावध पणे तोल ढासळून पडल्यावर हात पाय मोडतात गंभीर इजा होऊन काही माणसे जखमी होतात तर काहींना प्राणास मुकावे लागते .झाड खुप अवघड उंच किंवा निसरडे ढिसुर असेल तर झाडाखाली पडलेला पाला पाचोळा व लहान झुडपांची साफसफाई करुन जागा स्वच्छ करून ते झाड काठीने झोडपून हिरडे खाली पाडावे लागतात.
नंतर ते वेचणी करावी लागते.
पोत्यात किंवा गोणीत भरावे लागतात.
घरी घेऊन जाऊन कोवळा हिरवा ओला हिरडा मातीत, खळ्यात, किंवा खडकावर वाळवावा लागतो. साधारण पणे कडक वाळण्यासाठी चार पाच दिवस लागतात .
वाळल्या नंतर खारीक सारखे काळेकुट्ट कुळकुळीत होतात. जर दहा किलो ओले हिरडे वेचून वाळवले तर ते पुर्ण वाळल्या नंतर त्यांच्या दीड ते दोन किलो वजन भरते.या हिरड्या ला बाजार पेठेत खुप मागणी असते.
एक किलोला १७० रुपये बाजार आहे.बाळ हिरड्या चा उपयोग खोकल्यासाठी गुणकारी औषध म्हणून वापर केला जातो याची पावडर करुन मला सोबत सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो.त्याची चव गोड आंबट कडू तिखट तुरट असते.वात कप पित्त दोष दूर करते.त्रिफळा चुर्ण करतात.
जर
मोठा बी बाजलेला परिपक्व हिरडा असेल तर त्याचा वाळल्या नंतर रंग काळा न होता पिवळा तपकिरी होतो.याचा उपयोग रंगनिर्मिती कातडी कमावण्याच्या उद्योगासाठी होतो.आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारासोबतच काही आयुर्वेदिक आणि घरगूती उपचार तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात.
*सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी
आजकालच्या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे तुम्हाला सतत सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी मधात हिरड्याची पावडर मिसळून त्याचे एक चाटण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घ्या ज्यामुळे रात्री तुम्हाला निवांत झोप लागेल.
*. वजन कमी करण्यासाठी
हिरड्यामध्ये तुमचे शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आतड्यांना आराम मिळतो. याशिवाय तुमचे वजन देखील संतुलित राहते. त्यामुळे जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर हिरडा तुमच्या फायद्याची वनस्पती आहे. नियमित हिरडा कोमट पाण्यातून घ्या आणि वजन कमी करा
* घसा खवखवणे कमी करण्यासाठी
कधी कधी तेलकट पदार्थ, हवामानातील प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे तुम्हाला घशाचे इनफेक्शन होते. ज्यामुळे घसा बसणे अथवा घसा खवखवण्याचा त्रास जाणवू लागतो. जर तुम्हाला वारंवार असा त्रास होत असेल तर तुम्ही हिरड्याच्या पाण्याने गुळण्या करू शकता. कोमट पाण्याने केलेल्या या गुळण्यांमुळे तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळतो
*. मायग्रेनचा त्रास कमी होतो
मायग्रेनचा त्रास असेल तर जीवन जगणं अतिशय कठीण जातं. कारण या आजारपणात तीव्र डोकेदुखीला सामोरं जावलं जागतं. जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यातून हिरड्याची पावडर घ्या .
*मुळव्याधीवर उपयुक्त
मुळव्याध ही अशी एक समस्या आहे. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. मुळव्याधीमुळे पोट स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे सौचाला जाणं आणखी त्रासदायक होतं. मात्र जर तुमच्या घरी हिरड्याची पावडर असेल तर काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण तुम्ही पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.
*. डोळ्यांच्या समस्या दूर होतात
तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्ही हिरड्याचा वापर तुमच्या डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील करू शकता. कारण हिरडा डोळ्यांसाठी एक उत्तम औषध आहे. यासाठी हिरड्याच्या पाण्याने तुमचे डोळे स्वच्छ करा. नेत्र विकारा दूर करण्यासाठी आणि दृष्टीदोष कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता.
*. मूत्र विकारांवर उपयोगी
जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे. युरीनला गेल्यावर जळजळ होणे, युरीनचे प्रमाण कमी असणे अथवा सतत युरीन इनफेक्शन होणे असे त्रास होत असतील तर हिरड्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी मधातून हिरड्याची पावडर घातलेले चाटण दिवसभरात दोन वेळा घ्या.
* तोंडाचा अल्सर अथवा तोंड येण्यावर उपाय
जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या होत असेल तर त्यासाठी हिरड्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी हिरडाचे फळ उगाळून ती तोंडातील फोडांवर लावा. ज्यामुळे तुमच्या तोंडातील जखमा बऱ्या होतील.
*जखमा आणि सूज कमी करण्यासाठी
जखमा बऱ्या करण्यासाठी अथवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. कारण हिरडा तुमच्या शरीरातील सूजेला कमी करून शरीराचा दाह कमी करण्यास मदत करतो. यासाठी जखम अथवा सूज कमी करण्ययासाठी हिरडा कोमट पाण्यातून पिण्याचा सल्ला दिला जातो. हिरडा आणि सेंद्रिय गूळापासून तयार केलेले लाडू खाण्यामुळे देखील शरीराचा दाह कमी होतो आणि जखमा बऱ्या होतात.
*अॅसिडिटी होते
हिरड्याचा वापर अॅसिडिटीवर केला जातो. कारण हिरड्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. हिरडा तुमच्या पोटातील गॅस, अपचन कमी करण्यास मदत करतो. यासाठी अॅसिडिटी कमी करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा हिरडाचुर्ण रोज रात्री झोपताना घ्या. ज्यामुळे तुमचा अॅसिडिटीचा व
ज्यांना बद्धकोष्ठताचा त्रास होतो त्यांना हिरडा वरदान ठरू शकतं. संशोधनानुसार हिरड्यामधील औषधी गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकतो. यासाठी तज्ञ्जा हिरड्याचा कच्च्या फळांचा गर मीठासोबत खावा. दालचिनीसोबत हिरड्याचे चुर्ण घेण्यामुळेदेखील तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. ज्यामुळे शरीरातील आतड्यांची शुद्धी होते आणि सौचाला साफ होण्यास मदत होते.
*सांधेदुखीवर उपचार
हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते. बऱ्याचदा सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही एखादी पेनकिलर घेता मात्र त्यामुळे ते दुखणे तात्पुरते थांबते आणि पुन्हा थोड्यावेळाने सुरू होते. मात्र सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर नक्कीच करू शकता.*
लहान बाळाची पोटदुखी कमी करण्यासाठी
आईचे दुध पिणाऱ्या तान्हा बाळांना बऱ्याचदा पोट दुखीचा त्रास होतो. पोटात गॅस झाल्यामुळे ही लहान मुलं रडतात. लहान असल्यामुळे ती बोलून त्यांचं दुखणं सांगूही शकत नाही. त्यांच्या रडण्यातून त्याच्या आईला आणि डॉक्टरांना त्याची ही समस्या समजते. मात्र बाळघुटीतील हिरड्यांचे दिल्यामुळे बाळाच्या पोटातील गॅस कमी होऊ शकतो. मात्र हे चाटण देण्यापूर्वी बालरोग तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्या.
तसेच अपचन अतिसार मुळव्याधी , अजीर्ण, आम्लपित्त,दाह, रक्तपित्त, कुष्ठ रोग, पांडुरंग रोग, मुतखडा संधी वात,पित्तशूळ, नेत्ररोग,उलटी अशा अनेक आजारांवर हिरडा हे गुण कारी औषध आहे.
शब्दांकन.यश घोडे.फोफसंडीकर
COMMENTS