प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथे डिसेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथे डिसेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून "आस्था" कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २९ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन द्वारे तपासणी करण्यात आली.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, सिगारेट व मद्य सेवन, जीवनशैलीतील बदल व हर्मोनल असमानता या कारणामुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगात वाढ होत असल्याने महिलांनी योग्य ती काळजी घेऊन आपली प्राथमिक तपासणी करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी केले.
तपासणीमध्ये संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्या पुढील तपासण्या डेरे सोनोग्राफी सेंटर व कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव येथे अल्पदरात केल्या जाणार आहेत. तसेच पुढील उपचारासाठी देखील रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे डॉ. अमेय डोके यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. तेजश्री ढवळे, तपासणी तज्ञ नुरजहाँ शेख, आरोग्य सेवक संभाजी घोडे, आर. आर. गायकवाड, सविता कुऱ्हाडे, किशोर गुळवे, आशा सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS