महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नवम्बर १८९०) एक भारतीय समाज सुधारक. पहिली स्त्री शिक्षण शाळा ज्यांच्यामुळे सुरू झाली ...
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नवम्बर १८९०) एक भारतीय समाज सुधारक.
पहिली स्त्री शिक्षण शाळा ज्यांच्यामुळे सुरू झाली असे महात्मा ज्योतिराव फुले. ज्यांची माहिती आपल्याला पुस्तकात आज वाचायला भेटेल. पण खऱ्या अर्थाने आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या समवेत ज्यांनी आपल्या पत्नीला प्रेरणा दिली. पूर्वीची स्त्री जेव्हा स्त्रियांना चूल आणि मूल अशीच वागणूक दिली जात होती . तेव्हा अज्ञाचा अंधकार दूर करण्यासाठी आपल्या पत्नीशी खंबीरपणे उभे राहिले. अन्याय अत्याचार सहन करून मुलींसाठी मुलगी शिकावी म्हणून हा खटाटोप. त्यांच्या या कार्याचे मोल ते आपण करूच शकत नाही.
ज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘ शेतकर्याचा आसुड’ या ग्रंथात म्ह्टले आहे की-
विद्ये विना मती गेली!
मती विना निती गेली॥
निती विना गती गेली।
गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच!
आज पाहता आपण जयंत्या साजरा करतो त्या फक्त एक दिवसासाठी का ? आज ज्या शिक्षणामुळे स्त्रिया खरेतर स्त्रिया शैक्षणिक क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रात कुठेच कमी नाही .अन् हे आज शक्य झाले ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच. म्हणून आज एक त्यांचा आदर्श म्हणून कमीत कमी स्त्रियांचा सन्मान आणि त्यांना जर पाठबळ दिले तर त्या कमी कोठेच पडणार नाही. एक स्त्री ही दोन्ही कुटुंब सांभाळते त्याचबरोबर ती बाहेर ही वेगळी ओळख निर्माण करते. आणि जर प्रत्येक पुरुषात जर स्त्री चा आदर सन्मान केला तर हीच स्त्री कोठेच कमी पडणार नाही. आणि तेव्हा खर जयंती ही फक्त एक दिवसासाठी नाही तर मनातून त्यांच्या विचारांची आपल्या मनात कायम असेल.
लेखिका : शितल भगत
COMMENTS