जुन्नर : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगर पालिका हद्दीतील दिव्यांग लोकांना ५% निधि मिळावा म्हणून प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्य...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगर पालिका हद्दीतील दिव्यांग लोकांना ५% निधि मिळावा म्हणून प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र चे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण याच्या मार्गदर्शनात आज जुन्नर नगर पालिका चे शासकीय मुख्याधिकारी अधिकारी मा श्री संदीप भोळे साहेब याची भेट घेवून दिव्यांग लोकांना मार्च च्या अगोदर ५%निधी दिव्यांग लोकांनच्या बॅक खात्यात जमा झाले नाही या बाबत चर्चा व दिव्यांग लोकांना सन २०२० ते २०२४पर्यंत चा ५%निधि जमा खर्च व दिव्यांग नाव नोदणी यादी तसेच दिव्यांग लोकांना मिळणार्या लाभ या विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली या वेळी मुख्याधिकारी श्री संदीप भोळे साहेब यानी निवडणूक अचारसंहिता असल्या मुळे दिव्यांग लोकांना ५%निधीचा लाभ लाभार्थी च्या बॅक खात्यात जमा झाले नाही,५%निधि ची मंजूरी अचारसंहिता सुरू होण्या आधीच झाली आहे निवडणूक झाल्यावर लाभ १५ मे नंतर बॅंकेत जमा करण्यात येणार आहे तसेच दिव्यांग लोकांना मिळणार्या विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली तसेच निवडणूक मतदान च्या दिवशी सर्व दिव्यांग लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा या करीता जुन्नर नगर पालिका प्रशासन कडून दिव्यांग लोकांना मतदानाच्या दिवशी व्हीलचेअर व ज्या लोकांना मतदान बुथपर्यंत ने आण करण्यात जुन्नर नगर पालिका व संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात येणार तरी सर्व दिव्यांग लोकांनी मतदान करावा असे आवहान श्री संदीप भोळे साहेब यानी केले आहे लवकरच दिव्यांग लोकांना ५% निधि व विविध अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. या वेळी अरुण शेरकर अध्यक्ष, सौ चित्रा औटी मॅडम दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर नगर पालिका, सुनिल जंगम, स्वप्निल लांडे, गणेश महाबरे सामाजिक कार्यकर्ता, गोरक्ष नरविर व दिव्यांग बाधव उपस्थित होते. यावेळी श्री अरुण शेरकर यानी कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वात प्रथम ५% निधि दिव्यांग लोकांना जुन्नर नगरपालिकेने दिला आहे दिला या बद्दल मुख्याधिकारी साहेब व अधिकारी यांचे धन्यवाद व आभार मानले.
तसेच दिव्यांग ५% निधि लवकर जमा झाला नाही तर तीव्र आदोलन करण्यात येणार आहे असे माहीती दिली व उपस्थित सर्व दिव्यांग लोकांचे पदाधिकारीचे आभार मानले.
COMMENTS