प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) डिसेंट फाउंडेशन, पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मागील पाच महिन्यात जुन...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
डिसेंट फाउंडेशन, पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मागील पाच महिन्यात जुन्नर तालुक्यातील एक हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या असून त्यांना नवी दृष्टी मिळाली आहे.
सोमवार दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या माध्यमातून व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने सावरगाव येथे गेल्या चार महिन्यात हे पाचवे शिबिर असून आजच्या शिबिरात ५० नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व २१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. ऑपरेशन साठी गेलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, नाश्ता, जेवण व एक महिन्याची औषधे मोफत देण्यात येणार आहे. तालुक्यात आत्तापर्यंत सावरगाव, मढ, ओतूर, कुसुर, आळेफाटा, लेण्याद्री, ओझर अशा विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमधून आतापर्यंत १०६१ लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव फकीर आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जाधवर, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, सरपंच दीपक बाळसराफ, तंटामुक्ती अध्यक्ष राजन बाळसराफ, सदानंद डोके, परिचारिका, अशा सेविका, तपासणी तज्ञ, ग्रामस्थ व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS